* मंदिर इतिहास *


सुमारे ४०० वर्षांपूर्वी श्री चतुर्भूज नारायणाची काळया पाषाणाची स्वयंभू मूर्ती हरणखेड गावातील व्याघ्रा नदी मध्ये प्रकट झाली. गावकऱ्यांच्या एकमताने मूर्ती नदीतून बाहेर काढून स्थापित करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे बैलगाडीने हि मुर्ती गावाच्या दिशेने आणायला सुरुवात झाली. ठराविक ठिकाणी आल्यावर काही केल्याने बैलगाडी पुढे जात नव्हती. 'इथेच माझी स्थापना करा...' अशी नारायणाची आज्ञा असावी हे मानून गावकऱ्यांनी तिथेच नारायणाची स्थापना केली. याच ठिकाणी व्याघ्रा नदिच्या पैल तिरावर पुर्वाभिमुख आज श्रीं नारायणाचे मंदिर आहे. ज्या दिवशी ही स्थापना झाली तो दिवस होता दांडी पौर्णिमेचा. त्या दिवसापासून आजपर्यंत मंदिरात दांडी पौर्णिमेच्या सात दिवस आधीपासून श्रीमद्भभागवताचे पारायण केले जाते. श्री चतुर्भूज नारायण मंदिर ट्रस्ट तर्फे आयोजीत केल्या जाणार्या विविध वार्षिक उत्सवांपैकी दांडी पौर्णिमा उत्सव हा प्रमुख उत्सव आहे.
* उत्सव *

दांडी पौर्णिमा

विष्णू याग

दिपावली दीपोस्तव


* विश्वस्त मंडळ *

श्री चतुर्भूज नारायण मंदिर ट्रस्ट ची अधिकृत स्थापना १९८५ साली हरणखेड ता. बोदवड आणि हरणखेड ता.मलकापूर गावांतील ग्रामस्थांच्या तसेच तत्कालीन मान्यवरांच्या पूढाकाराने झाली. मंदिराचे विद्यमान अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ पुढीलप्रमाणे आहे.
*****
श्री विजयसिंह माधवसिंह पाटील, अध्यक्ष
श्री. निवृत्ती गोपाळ अहिर, उपाध्यक्ष
श्री. ज्ञानदेव जगन्नाथ फिरके, कोषाध्यक्ष
श्रीमती शोभा सुरेश जोशी, सचिव
श्रीमती सुमती दिनकर फिरके, सहसचिव
श्री. हेमंत दत्तात्रय जोशी, सदस्य
श्री. विलास विठ्ठल काळे, सदस्य
श्री. वीरेंद्र कुमार चंद्र कुमार जयस्वाल, सदस्य
श्री. भरतसिंह हिम्मत सिंह पाटील, सदस्य
सौ. इंदुबाई अशोक चांदेलकर, सदस्य
श्री. रामभाऊ बारसू फिरके, सदस्य
*****
शोध
* मंदिर ठिकाण *

मंदिर पत्ता
श्री चतुर्भूज नारायण मंदिर ट्रस्ट. हरणखेड, ता. बोदवड जि.जळगाव, ४२५३१०
संपर्क
श्री विजयसिंह माधवसिंह पाटील
९७६६४४८०५२
All rights Reserved ©Chaturbhuj Narayana Mandir Trust, Harankhed, 425310
Powered By: